स्वातंत्र्यसैनिक हरीकाका भडसावळे जयंती दिनानिमित्त
SRT शेतकरी कृषी सन्मान सोहळा 2024

२०११ साली संशोधित झालेल्या SRT सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कष्ट व खर्च कमी होऊन उत्पादनात भरीव वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी व आत्मविश्वासू होऊ लागले आहेत. शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेल्या SRT तंत्रज्ञानाचा शेतकरी कृषी सन्मान सोहळा व परिसंवाद दिनांक २२ मे २०२४ रोजी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थतीत संपन्न होत आहे. आपण सर्वानी या सोहळ्याला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती.


कार्यक्रम पत्रिका

प्रमुख उपस्थिती
मा. श्री. राजीवजी खांडेकर (कार्यकारी उपाध्यक्ष, एबीपी न्यूज नेटवर्क)

प्रमुख पाहुणे
मा. डॉ. मनीषा ताई कायंदे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य

स्थळ
सगुणा बाग, मालेगाव, पो. दहिवली (नेरळ) ता. कर्जत, जि. रायगड सोमवार, २२ मे २०२४, वेळ: सकाळी ९ ते सायं ४

 

वेळ तपशील
९:०० ते १०:०० नाव नोंदणी / चहा नाश्ता
१०:०० ते १०:३० SRT ZEBU* उद्घाटन

१०:३० ते १०:४५ दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व प्रमुख पाहुणे सत्कार -
मा. श्री. राजीवजी खांडेकर, कार्यकारी उपाध्यक्ष, एबीपी न्यूज नेटवर्क मा. डॉ. मनीषाताई कायंदे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
१०:४५ ते ११:१० प्रास्ताविक १ - कृषिरत्न शेतकरी श्री चंद्रशेखर ह. भडसावळे प्रास्ताविक २ - श्री परशुराम आगिवले

११:१० ते १२:०० SRT शेतकरी सन्मान वितरण व पुरस्कारार्थींचे मनोगत - ( १५ पुरस्कार )

१२:१० ते १२:२० मनोगत - श्री विकास पाटील, कृषि संचालक, महाराष्ट्र राज्य
१२:२० ते १२:४० प्रमुख पाहुणे मनोगत मा. श्री. राजीवजी खांडेकर, कार्यकारी उपाध्यक्ष, एबीपी न्यूज नेटवर्क
१२:४० ते १:२० SRT शेतकरी सन्मान वितरण व पुरस्कारार्थींचे मनोगत - ( १५ पुरस्कार )
१:२० ते १:३० मनोगत - श्री विजय कोळेकर, कृषी विद्यावेत्ता (पोकरा प्रकल्प)
१:३० ते १:४५ प्रमुख पाहुणे मनोगत -
मा. डॉ. मँनीषाताई कायंदे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
१:४५ ते १:५५ आभार प्रदर्शन - सौ. अनुराधा भडसावळे
२:०० भोजन
३:०० ते ४:०० SRT ZEBU* टोकणणी प्रात्यक्षिक (शेत नंबर ११ )


सूत्रसंचालन - सौ. दीपाली केळकर (प्रसिद्ध वृत्त निवेदिका)

SRT ZEBU* - (झेबू म्हणजे मानवाचा पहिला पाळीव प्राणी) - SRT शून्य मशागत शेती पद्धतीमध्ये टोकणणी, फवारणी, खत देणे, कापणी करणे अशी वेगवेगळी कामे करणारे नव्याने तयार केलेलं बॅटरीवर चालणारे स्वयंचलीत यंत्र आहे. हे यंत्र हैद्राबाद येथील INAV POWER या कंपनीने तयार केले आहे.