Services

Step 1 - जमीन नांगरून १३६ सेमी अंतरावर राख किंवा चुना वापरून रेषा आखून घेणे.

Step 2 - फावड्याच्या साहाय्याने कायमस्वरुपी गादीवाफा तयार करणे.

Step 3 - BBF यंत्र ट्रॅक्टरला जोडून कायमस्वरुपी गादीवाफे तयार करणे

Step 4 - गादीवाफे सारखे (LEVEL) करून घेणे

Step 5 - SRT गादीवाफ्यावर बी टोकणणी साठी वापरायचा लोखंडी साचा

Step 6 - दोन माणसांनी गादीवाफ्यावर SRT साच्याने भोके पाडताना

Step 7 - भाताचे ३ ते ४ दाणे व सुफला खताचे ३ ते ४ दाणे प्रती छिद्रात सोडून व्यवस्थीत झाकून घ्यावेत

Step 8 - पहिला चांगला पाऊस पडून जमिनीला वाफसा आल्यावर भाताचे व तणाचे बी उगवण्यापूर्वी निवडक तणनाशकाची मागल्या पावली फवारणी करणे

Step 9 - निवडक तणनाशकाची फवारणी झाल्यावर फक्त भाताची रोपे उगवून आलेली दिसतील.

Step 10 - भाताची उगवण झाल्यानंतर १५ ते २० दिवसामध्ये हलकी बेणणी व रिकाम्या जागा भरून घेणे

Step 11 - रिकाम्या भरून झाल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी युरिया ब्रिकेट खत चार रोपांच्या मध्ये एक या पद्धतीने जमिनीमध्ये टोचावे

Step 12 - भाताचे उत्तम भरघोस पिक.

Step 13 - भाताचे पिक कापून झाल्यावर वालाचे दुसरे पिक त्याच वाफ्यावर न नांगरता घेता येते
